Ads

मुस्लिम विद्यार्थ्यांनींना हिजाब बंदी करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून 'मेरा पोशाख मेरा अधिकार आंदोलन'

Maharashtra Pradesh Mahila Congress protests against Karnataka government banning hijab for Muslim students 'Mera Poshak Mera Adhikar Andolan'
चंद्रपूर: कर्नाटकमधील भाजप सरकारने मुलींना हिजाब घालून आल्या म्हणून वर्गात बसू दिले नाही. भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. सर्व धर्मीय विद्यार्थी शाळेत शिकत असतात मग आताच हिजाब ला बंदी का?? अशी बंदी घातल्यामुळे मुलींचे शिक्षण थांबू शकते. या सर्व घटनांमुळे हिंदू मुस्लिम सौहार्द देखील धोक्यात येऊ शकते म्हणूनच याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र महिला काँग्रेस , सेवादल शहर महिला काँग्रेस, सेवा फाऊंडेशन काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षातील अल्पसंख्याक महिला विभाग यांच्याकडून 'मेरा पोषाख मेरा अधिकार' हे आंदोलन आज करण्यात आले.

प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृत्वाखाली व चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक मधील शिक्षण संस्थेचा वाद मागच्या चार महिन्यापासून सुरू होता पण नेमकी उत्तर प्रदेश ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा वाद उकरून काढला आहे का? लहानपणा पासून आपण बघतोय की सर्व धर्माचे मुले शाळेत शिकतात पण या आधी असे प्रकार घडले नाही. आता ज्या पद्धतीने या घटना देशात घडत आहे त्यामुळे बहुसंख्यकांना अल्पसंख्याकांवर जरब बसवायची आहे की काय?? असा संशय येतोय असा आरोप नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी यावेळी भाजपा वर केला.

मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालून या आंदोलनात सहभाग घेतला व 'लडकी हू लड सकती हूं'
'मेरा लिबास मेरा अधिकार' या घोषणा देऊन कर्नाटक भाजप सरकारचा निषेध केला.

या आंदोलनाला अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, सामाजिक कार्यकर्ते मतीन कुरेशी,उपाध्यक्षा सुनीता धोटे, सेवा फाउंडेशन काँग्रेस च्या शहर अध्यक्षा शितल कातकर, महिला सेवादल च्या शहर अध्यक्षा लता बारापात्रे,उपाध्यक्षा परवीन सय्यद, नगरसेवक अमजद अली, सकिना अन्सारी,विणा खनके, मुन्नी मुमताज शेख,शमशाद बेगम,शफिया शेख, शेख,मंगला शिवरकर, समिस्ता फारुकी, वाणी डारला, चंदा वैरागडे,संगिता मित्तल, नेहा मेश्राम, पुष्पा नगरकर, मून्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, शहर सचिव हाजी अली, बापू अन्सारी, नाहीद काझी, मोबिन सय्यद, साजिद अली, ऐजाज कुरेशी, बबलू कुरेशी, महेश जिटे, इरफान शेख, किरण वानखेडे यांच्यासह किदवाई शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थिनींनी आणि बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment