Ads

शिवसेना प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी कोरपना व जिवती येथील निसर्गनिर्मित परंतु विकास पासुन दुर्लक्षित असलेल्या पर्यटन स्थळांची पाहणी केली

चंद्रपुर :-जिवती व कोरपना तालुक्यातील पर्यटन स्थळाला पर्यटन मंत्री मा. आदित्य जी यांच्या आदेशानुसार, पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख व प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी तेथील स्थानिक नागरिकासोबत पर्यटन क्षेत्राचा पाहणी • दौरा केला व त्या अनुषंगाने जिवती तालुक्यातील माणिकगड किल्ला पर्यटन स्थळ, मारुतीगुडा, विष्णू मंदिर मारुतीगुढा भिमदेव मंदिर, जंगुमाय स्थळ, जंगु देवी देवस्थान, संत सेवालाल महाराज देवस्थान रोडगुडा, मौजा कोरपना तालुक्यातील विविध धबधबे सिंगर पठार धबधबा, चिखली धबधबा, नगप्पा धबधबा, सावल हिरा भिम कुंड धबधबा बस, व नागाची कोरीव धबधबे, जांभुळदरा धबधबे, उमरीला धबधबे, मेहंदी येथे भोजपुरी धबधबा इत्यादी पर्यटन स्थळाला भेट देऊन तेथील उपस्थित गावकऱ्यांशी चर्चा केली व अधिका-याशी चर्चा केली. या क्षेत्रात पर्यटन वाढल्यास स्थानिकांना रोजगार तर वनविभागाला देखील उत्पन्न मिळु शकेल यातील बहुतेक क्षेत्र हे सोयीसुविधांपासून वंचित आहेत परंतु यासंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली जात नसल्याने दोन्ही तालुक्यात अनेक पुरातन वास्तू उभारल्या आहेत त्यांचे जतन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून लक्ष वेधण्यात करिता पुरातत्त्व विभागाच्या दप्तरी सुद्धा याची नोंद नाही आणि म्हणून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या पुरातत्त्व विभागाचा विकास करावा अशी मागणी प्रा. शिल्पा बोडखे यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री मा आदित्य साहेब ठाकरे यांच्याकडे पत्र देऊन केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment