Ads

होतकरू विद्यार्थिनीला सायकल वितरण

Distributing bicycles to budding students
चंद्रपुर:- चंद्रपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीला सायकलची निकड असल्याचे सांगितल्यावर विकलांग सेवा संस्थेद्वारा सोशल मीडियाचा सहारा घेतला व नवीन सायकल साठी लोकवर्गणीतून तिला केवळ सायकलच नव्हे तर थंडीपासून ऊब मिळावी म्हणून शाल व वस्त्रालंकार पुष्पगुच्छ सह वर्षा कोठेकर यांचे हस्ते सायकल अलीकडेच प्रदान करण्यात आली.
अमेरिकेतील संजय रोडे ,सीमादेवी ठाकूर , नृत्याविष्कार गुरूमाऊली मृणाल ,प्रिया कोल्हे मानकर ,संगीता माहूरकर ,वनश्री मेश्राम ,शोभा खोडके यांनी यासाठी आपला मौलिक वाटा उचलला .मदतीचा हात ह्या संघटनेच्या युवकांनीही कार्यक्रमाचा भार उचलला.
विकलांग सेवा संस्था गेल्या 2002 पासून समाजसेवेतून कृतिशील बांधिलकी जोपासत असून कौशल्य विकास प्रशिक्षण ,संगणक टायपिंग, वृक्षारोपण ,जुनी कपडे संकलन व वितरण, शासनमान्य शिवभोजन केंद्रात दिव्यांग ,वृद्ध महिलांना शुल्क विरहित मोफत जेवण , मूक प्राणी ,पक्षी दाणा पाणी उपक्रम तसेच दिव्यांग सल्ला मार्गदर्शन केंद्राद्वारे सेवारत आहे या कार्यक्रमाला यशस्वीकरिता पूजा राखोंडे ,पूजा पा न्हेरकर, अशोक खाडे ,देवराव कोंडेकर ,पूर्वा मेडपल्लीवार यांचे सहकार्य लाभले असे संस्था समन्वयक प्रसाद पा न्हेरकर ह्यांचे द्वारा कळविण्यात आलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment