Ads

वडगाव-नगिनाबाग प्रभागातील सामान्य नागरिकांवर महापौरांकडून अन्याय


चंद्रपूर : वडगाव प्रभागातील निवासी बांधकाम झालेल्या भूखंडावरील आरक्षण काढण्याची मागणी यापूर्वीच केली होती. तेव्हा सत्ताधिकाऱ्यांनी उदासिनता दाखवली. मात्र आता वडगाव व नगीनबाग प्रभागातील श्रीमंतांच्या भूखंडांवरील आरक्षण काढण्यासाठी तत्परता दाखवत आहे. त्यामुळे महापौर वडगाव व नगिनाबाग प्रभागातील सामान्य नागरिकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप मनपाच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.

नगीनाबाग प्रभागातील सर्वे क्रमांक ४९/२ या जागेवर शहराच्या विकास आराखडामध्ये बगीच्याचे आरक्षण आहे. त्याप्रमाणे वडगाव प्रभागातील मौजा वडगाव सर्वे क्रमांक १२/२ ही विकास आराखड्यामध्ये शेत जमीन दर्शविण्यात आली आहे. शहरातील प्रतिष्ठित व श्रीमंत नागरिकांच्या या दोन भूखंडावरील आरक्षण काढून त्यांना रहिवाशी क्षेत्रांमध्ये परावर्तित करण्याचा विषय सभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला होता. मात्र याला नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रखर विरोध केला. यापूर्वीच वडगाव प्रभागातील अनावश्यक आरक्षणे काढून सदर ले-आउट किंवा भूखंड निवासी वापरासाठी परावर्तीत करण्याची मागणी केली असताना सत्ताधिकाऱ्यांनी उदासीनता दाखवली. मात्र आता श्रीमंतांच्या दोन भूखंडांवरील आरक्षण काढण्यात सत्ताधाऱ्यांनी तत्परता दाखवत आहे. त्यामुळे ठराविक व निवडक भूखंडाचे आरक्षण काढण्याचे धोरण अन्यायकारक असून महापौर वडगाव व नगीनाबाग परिसरातील नागरिकांवर अन्याय करीत असल्याचा आरोप पप्पू देशमुख यांनी केले.
भाजपाला घरचा अहेर
भुखंडाच्या आरक्षणाच्या प्रस्तावाला भाजपाचे नगरसेवक राहुल घोटेकर तसेच भाजपच्या गटातील शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पचारे यांनीही विरोध करून या नगरसेवकांनी भाजपला घरचा अहीर दिला. भूखंडावरील आरक्षण काढण्याचा नियमबाह्य ठराव मागे न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सुद्धा भाजपचे नगरसेवक घोटेकर यांनी दिला आहे.
दत्तनगर मधील नागरिकांना दिलासा
दत्तनगरमध्ये अनेक पट्टेधारकांनी घरासमोर व्यवसायिक गाळे काढले. त्यामुळे संपूर्ण इमारतीवर वाणिज्य वापराच्या दराने शुल्क आकारून पट्टे देण्याची कार्यवाही मनपाने केली होती. मालमत्ता कर आकारणी करताना निवासी इमारत व दुकानांना वेगवेगळे कर लावण्यात आले होते. त्यामुळे पट्टे देताना सरसकट संपूर्ण इमारतीला वाणिज्य वापराचे शुल्क आकारणे चुकीचे असल्याची बाब नगरसेवक पप्पू देशमुख आयुक्त बिपीन पालीवाल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत दत्तनगरमधील अशा सर्व नागरिकांना पट्टे देताना व्यावसायिक गाळे व निवासी इमारतीकरिता वेगवेगळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने तेथील नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment