Ads

विवेकानंद महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

भद्रावती:-
मातृभाषा ही प्राणवायूसारखी असते. श्वास घेण्यावर कोणी बंदी आणू शकत नाही आणि त्यावर कोणते सरकारही कर आकारू शकत नाही . पण जर एखादा समाज स्वतःच कृत्रिम श्वास घेत असेल तर ती त्याचीच चूक आहे. आपण मराठी बोललो तर मागासले समजले जाऊ असा मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या मनात न्यूनगंड असतो. इतर सामान्य समाज त्याचेच अनुकरण करतो. कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचे अस्तित्व त्याच्या मातृभाषेतच असते. पण सामाजिक व्यवहारातून आपण आपल्या भाषेचा प्राणवायू घेत नसलो तर संस्कृतीही संपुष्टात येण्याची शक्यता असते. शिक्षणाचे माध्यम असो की प्रशासन या क्षेत्रात लोकांच्या इच्छेनेच मराठीचा वापर झाला तरच आपल्या भाषेला उज्वल भविष्य आहे. असे विचार धुळे जिल्ह्यातील वेल्हाना येथून बोलताना हर्षदा बोरसे बोरगावकर यांनी व्यक्त केले. त्या स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागाद्वारे आयोजित "मराठी भाषा गौरव दिन" सोहळ्यात मार्गदर्शन करताना बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात आभासी पद्धतीने झालेला या कार्यक्रमास डॉ. सुधीर होते, पत्रकार सुधीर पतरंगे, प्रा. अमोल ठाकरे, डॉ.यशवंत घुमे, रुपेश चिवडे, हर्षदा भोयर, प्रथम डाखरे, संजना रणदिवे, सुरज मानकर, माधुरी खोके, आरती भसारकर यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. यशवंत घुमे,आभार प्रदर्शन प्रा. अमोल ठाकरे यांनी मानले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment