Ads

हायवा ट्रक च्या धडकेत भोयेगाव येथील दोन दुचाकीस्वार जागीच ठार.

Two two-wheelers from Bhoyegaon were killed on the spot in a collision with a highway truck
कोरपना:- कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे गडचांदूर घुगुस जिल्हा महामार्गावर सायंकाळी साडेपाच वाजताचे सुमारास भरधाव हायवा ट्रकने कवठाळा स्टेट बँकेच्या समोर गडचांदूर वरून भोयगावला परत जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दूचाकी चालक विठ्ठल गुंजेकर 54 वर्ष पुरुषोत्तम निर 45 वर्ष हे जागीच ठार झाले. घटनेची कल्पना लागताच कवठाळा गावचे सरपंच नरेश सातपुते हे आपल्या साथीदारा समवेत या ठिकाणी पोहोचले असता ट्रक चालक ट्रक सहित फरार झाल्याचे कळताच कवठाळाचे सरपंच नरेश सातपूते यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या दुचाकीने आपल्या साथीदारांसह वनसडी येथे तीस किलोमीटर अंतरावर नांरडा फाट्याजवळ शेवटी ट्रकला पकडले. सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली असता गडचांदूर चे ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, कवठाळा बीटचे अंमलदार चरणदास मडावी यांनी ट्रक ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मागील दोन वर्षापासून गाव ते गडचांदूर या जिल्हा महामार्गाचे काम अगदी संथ गतीने सुरु असल्यामुळे या ही अगोदर या प्रकारचे अनेक अपघात याठिकाणी घडले. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आणि अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. मात्र प्रशासनाच्या संथ आणि दुर्लक्षित धोरणामुळे मालिका सारखी सुरूच आहे
नरेश मदन सातपुते.        (सरपंच कवठाळा)
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment