जिवती :- देवलागुडा येथील आत्महत्याग्रस्त पिडीत कुंटुंबीयांना तातडीने शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समीतीचे अध्यक्ष सुदाम राठोड यांच्या नेतृत्वाखाली जिवती तहसील कार्यालयावर गुरूवारी काढण्यात आला.या न्याय हक्कासाठी काढलेला भव्य जनआक्रोश मोर्चा देवलागुडा ते जिवती तयसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आला.त्यात मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती.
तालुक्यालगत असलेल्या देवलागुडा येथील तरूण शेतकरी लक्ष्मण हरी जाधव यांनी शेतातच विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेला 23 दिवस लोटून गेले तरी प्रशासनाने त्या पिडित कुटुंबीयांची भेटही घेतली नाही.व शासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी हालचाली केल्या नाही.या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या शिष्ठमंडळाने जिवती तहसिलदारांची भेट घेऊन तातडीने शासनाची आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनही पाठविले होते.माञ आठ दिवसानंतरही स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून पिडित कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळविण्यासाठी कुठलिही हालचाल न केल्यामुळे संतप्त नागरीकांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जिवती तहसील कार्यालयावर भव्य जनआक्रोश मोर्चा काढून पिडित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनी तात्काळ शासकीय आर्थिक मदत द्यावी यासाठी शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले असून आठवडाभरात पिडित शेतरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत न मिळाल्यास जिवती तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पिडित शेतकरी आत्महत्याग्रस्तसह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशाराही सुदाम राठोड यांनी निवेदणातून दिला आहे.पिडित शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळविण्यासाठी काढलेल्या या भव्य जनआक्रोश मोर्चात विदर्भ राज्य समितीचे अध्यक्ष सुदाम राठोड,जिवन तोगरे,विनोद पवार,अरविंद चव्हाण,किरण राठोड,सुनील राठोड,प्रविण राठोड,मधूकर राठोड,शंकर राठोड,अशोक जाधव,गोविंद जाधव,शामराव राठौड,तिरूपती राऊत,नाजुबाई राठोड सुनिता जाधवसह पीडित शेतकरी कुटुंबासह गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दिड तासांनी घेतली तहसीलादारांने दखल
पिडित कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काढण्यात आलेला मोर्चा तहसिलच्या मुख्य गेटवर दिड ते दोन तास मागण्या पुर्ण करण्यासाठी भर उन्हात ताटकळत महिला पुरूषांनी घोषणा देत होते.माञ तहसिलदार हजर असतांनी त्यांच्या व्यथा व आक्रोशाकडे दुर्लक्ष केले तब्बल दिड-दोन तासांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्विकारले.यावेळी जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते,सुरेश केंद्रे,केशव गिरमाजी,दत्ता राठोड,सायसराव कुंडगीर उपस्थित होते
0 comments:
Post a Comment