Ads

*डॉ.कंदीकोंडा यांच्या निधनाने भारतीय चिञपट क्षेञातील एक उत्तम गीतकार गमविला .


चंद्रपूर:- टॉलीवुडचे प्रख्यात गीतकार, कवी डॉ.कंदीकोंडा यांच्या निधनाने भारतीय चिञपट क्षेञातील एक उत्तम गीतकार गमविलाDr. Kandikonda's demise marks the loss of one of the best lyricists of Indian cinema असल्याचे प्रतिपादन युवाकवी महेश कोलावार यांनी केले आहे.

डाॅ.कंदीकोंडा यांच्या निधनाबद्दल आपली शोककळा व्यक्त करतांना कोलावार यांनी म्हणाले की,प्रकृती व संस्कृतीवर जीवापाड प्रेम करणारा गीतकार गमविला.अगदी अल्पावधी काळातच त्यांनी १००० च्या वर गीतलेखन केले.२००१ साली दिग्दर्शक पुरी जगननाथ यांच्या 'इटलु श्रावणी सुब्रमण्यम' या चिञपटाद्वारे चिञपटात पदार्पण करुन आजपर्यंत १२०० च्या वर चिञपट गीत लेखन केले.

मागील आठ वर्षापासून ते कँन्सरग्रस्त होते.मधल्या काळात त्यांनी खूप कमी चिञपटात काम केले.पण सुरुवातीच्या एक दशकात माञ त्यांनी आपल्या गीतलेखनाने अधिराज्य केले.त्यांची अनेक चिञपट व प्रायवेट अल्बम गीत टॉलीवुडमध्ये एका काळात सेनसेशन निर्माण केले.(उदा.मल्ली कुयवे गुव्वा,इ रोजे तेलसिंदी,मनसा नुव्वु वुंडे चोटे चेप्पम्मा,अक्कड बक्कड बंबोयबो,चुपुलतो गुच्ची गुच्ची चंपके,रामा रामा रामा रामा रघुकुल सोमा,जगडमे,गला गाला पारुतुन्ना गोदारीला असे अनेक अजरामर गीत.)

भारतीय चिञपटात गुलजार,जावेद अख्तार,वैरा मुत्तु,वेटुरी सुंदराराममुर्ती, सिरीवेण्यला सीतारामाशास्ती शास्ञी,साहिर लुधियानवी,चंद्रबोस,सुद्धाला अशोकतेजा,ग.दि माडगूळकर,जगदीश खेबुडकर,समीर,साहिद खाद्री,अमिताब भटटाचार्य,जयंत कायकिनी असे भारतातील ९० ते १०० दिग्गज गीतकारांच्या यादीत त्यांचा नाव गर्वाने घेतला जाणारा होता.टाॅलीवुडचे सुपरस्टार महेशबाबू यांच्यापासून तर भारताचे सुपरस्टार रजनीकांत  indian superstar Rajnikant यांच्या चिञपटापर्यंत त्यांनी काम केले.आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

सन २०१४ ते २०१५ मध्ये मी हैद्राबादला असतांना दि.२३ डिसेंबर २०१४ ला डाॅ.कंदीकोंडा यांच्याशी एकदा माझी प्रत्यक्ष भेट झाली व दोनदा फोनवर बोलणं झालं.त्या भेटीत त्यांनी मला लिखाण्याच्या बाबतीत काही टिप्स पण दिले.२०१५ नंतर मी हैद्राबाद सोडून महाराष्ट्रात परत आलो.मग या मधल्या ७ वर्षात त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी त्यांना मी फाॅलो करत होतो.दरवर्षी त्यांचा एकतरी 'बतुकम्मा' गीत (तेलंगानातील खूप मोठा उत्सव) खूप गाजायचा.अतिशय सुलभ व व्यवहारीक भाषेत गीतलेखन करणारे दिग्गज गीतकार आज आपल्यात नसल्याचे तीव्र दु:ख होत आहे,अशी भावना महेश कोलावार यांनी यावेळी व्यक्त केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment