ना. नितीनजी गडकरी साहेब केंद्रिय मंत्री भारत सरकार यांचे संकल्पनेतुन व नागपुर जिल्हा बॅटमिंटन असोसीएशन व्दारा आयोजीत खासदार क्रीडा महोत्स्व मध्ये प्रणय सुशांत गाडेवार रा. मनीषनगर नागपुर याने 15 वर्षाखालील एकेरी स्पर्धे मध्ये अंतीम फेरीत त्याचा प्रतीस्पर्धी स्पर्श कावळे याचा 21-11, 21 7 ने पराभव करत विजेते पद पटकावले. तसेच 17 वर्षाखालील एकेरी स्पर्धे मध्ये अंतीम फेरीत प्रवेश करीत अंतीम फेरी मध्ये अव्वल नामांकीत अमेय नाकतोडे याच्या कडुन 22-20, 15-21 10-21 ने पराभुत होवुन उपविजेता ठरला. व 15 वर्षा खालील दुहेरी स्पर्धे मध्ये उपांत्य फेरी गाठुन उपांत्य् पदक पटकावले. सदर सामने सुभेदार हॉल रविनगर येथे दिनांक 18.5.2022 ते 22.5.2022 या कालावधीत घेण्यात आले. दिनांक 22.5.2022 रोजी झालेल्या बक्षिस वितरण समारंभात श्रीमती कुंदाताई विजयकर अध्यक्ष एन.डी.बी.ए. व माश्री. मंगेश काशीकर सचिव एन.डी.बी.ए यांचे शुभ् हस्ते प्रणय ला तिनही विजेते पदक बहाल करण्यात येवुन सन्मानीत करण्यात आले. प्रणय हा सोमलवार हायस्कुल निकालस शाखा नागपुर चा इयत्ता नववी चा विदयार्थी असुन तो अजय दयाल बॅटमिंटन अकादमी नागपुर येथे मागील 5 वर्षापासुन नियमीत सराव करतो. प्रणय ने यापुर्वी 2017 मध्ये भगीनी मंडळ व्दारा आयोजीत नागपुर जिल्हा बॅटमीटन 10 वर्षा खालील एकेरी स्पर्धे मध्ये उपविजेते पद पटकावले असुन विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय स्पर्धे मध्ये सहभागी झालेला आहे. प्रणय हा सुशांत गाडेवार भद्रावती येथील कृषी अधिकारी यांचा मुलगा आहे. प्रणय ने आपल्या विजयाचे श्रेय आई, वडील, सोमलवार हायस्कुल निकालस शाखा नागपुरचे प्राचार्य, वर्ग शिक्षक, क्रिडा शिक्षक, व कोच अजय दयाल यांना दिले आहे. या विजया बदल प्रणयचे सर्व स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

0 comments:
Post a Comment