'सिंदेवाही - तालुक्यातील बँक आफ महाराष्ट्र शाखा कळमगाव गन्ना Bank of Maharashtra येथील परिसरातील जवळपास दहा गावातील साहशे बँक खातेदार ग्राहकांची खाती संबंधित बँक प्रशासनाने सिंदेवाहीच्या महाराष्ट्र बँकेत वळविण्यात आली आहेत .त्यामुळे या परिसरातील ग्राहकांना आपापल्या गावातून बँकेत कामासाठी वेळ व पैसा खर्च करून नाहक त्रास सहन करावा लागत आहे .

या अन्याया विरोधात त्रस्त खातेधारकानीं यापूर्वी बँक प्रशासन विरोधात जनआक्रोश मोर्चाही काढला आहे . परंतू बँक प्रशासन अन्याय झालेल्या खातेधारक यांचे का ऐकून घेत नाही हेही कळायला मार्ग नाही .त्यातल्या त्यात या प्रकरणात या क्षेत्रातील पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य अजूनही शांत का बसले आहेत ? असा संतप्त सवालही ग्राहक जनता लोकप्रतिनिधींना विचारत आहेत .
तेव्हा शासन व प्रशासनाने अन्याय ग्रस्त नागरिकांचा अधिक अंत न पाहता त्यांना राहत प्रधान करावी ,अशी मागणी मायावती फेन्स क्लब सिंदेवाही अध्यक्षा आम्रपाली बागेसर यांनी केली आहे .
____________________________________
0 comments:
Post a Comment