ब्रम्हपुरी :-ब्रम्हपुरी-नागभीड मार्गांवर प्रवाश्यांसाठी चालकांची मोठी मनमानी व दादागिरी सुरू असून शनिवारला सकाळ सुमारास घडलेल्या एका घटनेत ऑटो चालकाने माझा प्रवासी का घेतला...? या शुल्लक कारणासाठी ट्रॅव्हल्स वाहकाला भर चौकात मारहाण केल्याची घटना घडली. शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणारे काही चालक मुजोरवृत्तीने भररस्त्यावर मनमानी करीत असल्याने यावर पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी होतं आहे.
शनिवार सकाळला चंद्रपूर वरून ब्रम्हपुरी कडे येणारी ट्रॅव्हल्स नागभिड मार्गे येत असतांना नागभीड -ब्रम्हपुरी मार्गातील भिकेश्वर येथून काही कॉलेजच्या विद्यार्थिनी कॉलेज मध्ये काही अर्जंट कामे असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्स वाहक नामे प्रवीण रामाजी धानोरकर रा. जवराबोडी याला विनंती केल्याने त्या वाहकाने विद्यार्थी मुलांचे शैक्षणिक कार्य व त्यांची गरज बघता ट्रॅव्हल्स मध्ये बसवले मात्र रस्त्यातून माझे प्रवासी का घेतले..? असे विचारणा करीत शुल्लक कारणासाठी वाद विकोपाला नेत ऑटो चालक सुनील नंदुरकर याने ट्रॅव्हल वाहकास मारहाण केली. या घटनेची वाहक प्रवीण धानोरकर याने त्याला मारहाण करणाऱ्या ऑटो चालक सुनील नंदुरकर विरुद्ध पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे तक्रार नोंदवली असून कलम 323 अंतर्गत अदखलपात्र गुन्हाची नोंद पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे झालेली आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक -वाहकांकडून याआधी सुध्दा असे प्रकार भरचौकात अनेकदा घडत असून याचा त्रास सामान्य प्रवास्यांना सुद्धा करावा लागतो चालक- चालकांतील क्षेत्रनिहाय नियमावलीच्या वादाचा राग साधारण प्रवाशावर काढून भररस्त्यात हमरीतुमरी ची भाषा वापरत असल्याने सामान्य नागरिकांस नाहक अपमान सहन करावं लागत आहे .पोलीस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर लक्ष देऊन दादागिरी व मनमानी करणाऱ्यांवर कारवाई केल्यास गुंड प्रवृत्तीच्या लोकांची हिम्मत बळावणार नाही व पोलिसांनी अशा प्रवृतीवर वेळीच कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सर्व स्तरावरून होतं आहे
0 comments:
Post a Comment