गडचांदूर:-मुस्लिम समाज बांधवांचे प्रेरणास्थान,टधर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अभद्र व आक्षेपार्ह्य विधान करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या निष्कासित प्रवक्त्या नुपूर शर्मा तसेच नवीन जिंदाल आणि नरसींमानंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी अशी मागणी गडचांदूर येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे.
यासंदर्भात ठाणेदार सत्यजित आमले यांंच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवण्यात आले. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा अपमान असहनिय असून नुपूर शर्मा यांच्या आक्षेपार्ह व बेजबाबदारपणाच्या विधानामुळे समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे.देश,विदेशातून या विधानाचे तिव्र शब्दात निषेध होत आहे.समस्त मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली असून दोन समाजात द्वेष व कटूता निर्माण करून शांतीप्रिय या देशात अराजक्ता पसरविण्याच्या हा प्रयत्न काही लोकांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.अशा समाजकंटकांना अटक करून यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी मुस्लिम बांधवांतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना गडचांदूर रज़ा मशीदीचे मौलाना सैय्यद हसनैन रज़ा,गौसीया मशीदीचे मौलाना छोटे हसनैन रज़ा,मौजन सैय्यद कुतबुद्दीन,राकाँ जिल्हा महासचिव रफिक निजामी,पत्रकार सैय्यद मूम्ताज़ अली,इर्शाद कादरी,सैय्यद साहेब अली,अनीस कुरेशी,अजीम बेग,शेख पाशा,अश्फाक लांबा, शब्बीर ढाकवाला,रसूल ठेकेदार,अजी़ज कुरेशी,अतीक कुरेशी,वकील कुरेशी,रिजवान कुरेशी,सैय्यद रियाज़ यांच्यासह इतर मुस्लिम बांधवांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment