Ads

पप्पू देशमुख यांना रामनगर पोलिसांनी बजावली नोटीस : पोलीस विभागाचा नोटीस म्हणजे सुडबुद्धीने केलेली कारवाई.

चंद्रपूर :- मागील १५ महिन्यांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचारी कोविड योद्ध्यांच्या थकीत पगारासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात डेरा आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांनी १२ जून रोजी कलम १४९ अंतर्गत पप्पू देशमुख यांना नोटीस बजावला आहे. आंदोलन मागे न घेतल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही नोटीसमधून दिला आहे.
जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमावबंदी असल्याचे तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने व पावसाळ्यामुळे आंदोलनाचा मंडप पडून हाणी होण्याची शक्यता असल्याने आंदोलन मागे घ्यावे, असा उल्लेख नोटीसमध्ये नमूद आहे. मात्र १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या डेरा आंदोलनाने अनेक वेळा पाऊस आणि वादळाचा अनुभव घेतला आहे. यादरम्यान अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याकरिता जमावबंदीचे आदेश काढले आहेत.
एवढेच नव्हे तर मागील जवळपास १० महिन्यांपासून डेरा आंदोलनाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. नोटीसमध्ये दिलेली सर्व कारणे अनेक महिन्यांपासून लागू असताना आत्ताच पोलीस विभागाने नोटीस कशी बजावली, असा प्रश्न आहे. पोलीस अधीक्षक व दोन पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्याने नोटीस पाठवून धमकावण्याचा प्रकार पोलीस अधिकारी करीत आहेत. अशा धमक्या व सूडबुद्धीच्या कारवाईला आपण भीक घालत नाही, अशी प्रतिक्रीया देशमुख यांनी दिली.
पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची इडीकडे तक्रार करणारच
कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरु आहे. ते उठविण्यासाठी असा प्रकार सुरु आहे. परंतु, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही. कोणी कितीही दबाव आणला तरी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मदन पाटील व मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुराव्यानिशी 'ईडी' कडे तक्रार करणार असल्याचे पुन्हा एकदा देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केले आहे.

सुडबुद्धीने केलेली कारवाई
आपल्या न्याय हक्कासाठी कायदेशीर मार्गाने डेरा आंदोलन सुरु झाले. पोलिसांनी नोटीसामध्ये नमूद केलेल्या कारणात तथ्य वाटत नाही. कारण आंदोलनाच्या १६ महिन्याच्या काळात अनेकदा जमावबंदी झाली. अनेकदा पावसाचा फटका बसला. सर्व कारणे अनेक महिन्यांपासून लागू असताना आत्ताच पोलीस विभागाने नोटीस कशी बजावली. पोलीस अधीक्षक व दोन पोलीस अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार केल्याने नोटीस पाठवून धमकावण्याचा प्रकार पोलीस अधिकारी करीत आहेत. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई असून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या धमक्यांना आपण भीक घालत नाही.
-पप्पू देशमुख, अध्यक्ष जनविकास सेना

अवैध व्यवसायांना अधिकाऱ्यांचे संरक्षण
जिल्ह्यात राजरोसपणे दारू, रेती, कोळसा, सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या बातम्या विविध माध्यमांमधून येत आहेत. या अवैध व्यवसायिकांना संरक्षण घेऊन करोडो रुपयांची माया जिल्ह्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जमवली आहे. मूल मार्गावर एक अधिकारी करोडो रुपयांची गुंतवणूक करून रीसॉर्ट तयार करीत असल्याची तर काही अधिकाऱ्यांनी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील जमिनींमध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व इतर काही विभागातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची जंत्री तयार करणे सुरू असून लवकरच यांना कायद्याचा वापर करून ४४० होल्टेजचा झटका देणार असल्याचे देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकातून जाहीर केले आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment