चंद्रपुर :-केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेमुळे देशामध्ये शांती सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अनेक राज्यांमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेच्या तीव्र निषेध करीत आहे अनेक ठिकाणी हे आंदोलन हिंसक झाल्याचं पहायला मिळत आहे.
या योजनेत सैन्यदलात सामील झालेले सैनिकाना केवळ चार वर्ष आपली सेवा देणे असून त्यातील 25% सैनिकांना मुख्य प्रवाहात सैन्यात घेतले जानार आणि उर्वरित म्हणजेच 75% सैनिकांची सेवा संपुष्टात येणार असून त्यांना सरकार व्दारे पेन्शन किंवा मेडिकली कुठली ही सेवा मिळणार नाही. या योजनेमुळे शत्रूशी लढताना अपला कार्यकाळ संपत असल्याच्या काळजी ने सैनिकांचे खच्चीकरण सुध्दा होतील. यामुळे आर्मी भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाईला याचा विरोध करावा लागतो आहे
या योजनेमुळे अनेक घटना देशात घडू शकतात ज्या देशाच्या आंतरिक सुरक्षेचा शुद्ध प्रश्न निर्माण होऊ शकतो जे 75% सैनिक वयाच्या 23-24 व्या वर्षी निवृत्त होतील असे सैनिक अतिरेकी याच्या निशाण्यावर असतील नक्षलवाद सुद्धा आपले पाय पसरवण्यास पुढे सरसावेल.
या योजनेत महत्त्वाचे असे की निवृत्त सैन्यांना पेन्शन नाही. जर एखादा आमदार दोन दिवस नंतर राजीनामा देत असेल तर त्याला आजीवन पेन्शन दिल्या जाते परंतु जो जवान देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःचे प्राण धोक्यात टाकून देशाची रक्षा करतो, प्राणाची आहुती देतो, त्याला मात्र पेन्शन नाही मेडिकली कोणती सुविधा नाही, यातून एकच निष्पन्न होते की ही योजना रक्षा विशेष तज्ञ यांच्याकडून सल्ला न घेता तयार करण्यात आलेला आहे ही योजना अनेक प्रश्न निर्माण करणारी असून या योजनेमुळे देशात आर्मी भरतीच्या तयारी करीत असणारे युवकांची आत्महत्या करण्याचा आकडा सुद्धा वाडीवर आहे सरकारने नम्रतेची भूमिका घ्यावी आणि हा कायदा त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम आदमी पार्टी संपुर्ण देश भर मोठं आंदोलन उभारेल यांचे जबाबदार केवळ केंद्र सरकार असेल. अशी मागणी तीनही दलाचे प्रमुख माननीय राष्ट्रपती यांना शहर सचिव राजू कूड़े , युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी च्या मार्फत निवेदनातून करण्यात आले. यावेळेला आम आदमी पार्टीचे आम आदमी पार्टी महिला अध्यक्षा ॲड.सौ सुनीता ताई पाटील जिल्हा सचिव श्री संतोष जी दोरखंडे महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख महिला सचिव आरतीताई आगलावे बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, अमजत भाई,महेश पाजी, वंदना कुंदावार सतीश, सरफराज भाई, अल्फीया अमजद खान तसेच अनेक युवा कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment