Ads

स्व. कालिदास अहीर यांच्या जन्मदिन स्मृतिनिमित्त 12 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन ..

चंद्रपूर:- सामाजिक तथा क्रीडा क्षेत्रातील धडाडीचे युवा नेतृत्व कमल स्पोर्टींग क्लब चे संस्थापक स्व. कालिदास गं. अहीर यांच्या जन्मदिवसानिमित्त दि 12 ऑगस्ट 2022 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे Blood Donation Camp आयोजन करण्यात आले आहे. कमल स्पोर्टींग क्लब तथा कालिदास अहीर प्रतिष्ठान द्वारा आयोजित या रक्तदान शिबीराचे यंदा वे वर्ष असून चंद्रपूरातील आय.एम.ए. हॉल, गंजवार्ड, चंद्रपूर येथे सकाळी 9-00 ते 4-00 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर Former Union Minister of State for Home Hansraj Ahir यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या रक्तदान शिबीरात मान्यवर अतिथींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. रक्तदानासारख्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यात योगदान देण्यासाठी युवकांनी या शिबीरात सहभागी होवून रक्तदान हेच श्रेष्ठदान मानत रक्तदान करावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कमल स्पोर्टींग क्लब तथा स्व. कालिदास अहीर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment