ब्रम्हपुरी:- सोशल मीडियावर वायरल होणारा व्हिडिओ हा वाढदिवसाच्या पार्टीचा आहे, आणि ही पार्टी कोणाच्या घरी नाही तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत झालेली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यअनुपस्थितीत आरोग्य केंद्राला पब चं रूप देणाऱ्या ह्या तरुणांवर तर कारवाई झालीच पाहिजे मात्र संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायला हवी.!
कंत्राटी आयुर्वेदिक डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनाने अहंकार दुखावलेल्या जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत सर्व आयुर्वेदिक डॉक्टरांना बहिशःल केलं व आता गेले जवळपास महिनाभर मुडझा सारख्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोणी वाली उरलेला नाही.!
आयुर्वेदिक डॉक्टर स्वतः मुख्यालयी राहून नोकरी करायचे, मुसळधार पाऊस असो की कोविड ची साथ असो रात्रीचा दिवस करून ह्या डॉक्टर मित्रांनी रुग्णसेवा केलेली आहे, मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या अहंकारापोटी ह्या रुग्णसेवी डॉक्टरांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने आता ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था भर पावसाळ्यात उघड्यावर पडलेली आहे.! गोरगरीब, दलित, आदिवासी जनतेला प्राथमिक आरोग्य सुविधांच्या अभावी सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाची प्रायश्चित हे अधिकारी कसे करणार आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरांना परत कामावर कधी घेणार हाही प्रश्न आता जनता विचारत आहे.?
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवणाऱ्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी प्राप्त होवो व त्यांनी त्वरित कार्यवाही करत सकारात्मक पावलं उचलावीत हीच जनतेची विनंती.!

0 comments:
Post a Comment