ऊर्जानगर (चंद्रपूर):-महाराष्ट्र राज्य विघुत कर्मचारी,अभिंयते व अधिकारी राज्यस्तरीय संघर्ष समितीच्या वतिने संपूर्ण महाराष्ट्रभर आज निदर्शने घेण्यात आली त्याच धर्तीवर विज कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सी टी पी एस चंद्रपूर द्वारा सुधारित विघुत दुरुस्ती कायद्या विधेयक-२०२२ एकतर्फी लोकसभेत पारित केला व स्थायी समितीकडे मंजुरीस पाठविले त्याला विरोध करण्याकरिता आज दि.०८ आगस्ट २०२२ ला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जाभवन गेट समोर निदर्शने घेण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेचे शाखाध्यक्ष विक्की राठोड, ग्रॅच्युएट इंजिनियर्स असोसिएशनचे संयुक्त सचिव स्वराज आमले,सर्बोडिनेट इंजिनियर्स अशोसिएशनचे सहसचिव नितीन काळे , एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष रविदास मडावी,महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे केंद्रीय सचिव मिलिंद कोटरंगे ,पावर फ्रंटचे केंद्रीय संघटक अभयकुमार मस्के, आर.एच.वर्धे केंद्रीय सरचिटणीस महाराष्ट्र राज्य विद्युत बहुजन अधिकारी,कर्मचारी संघ यांनी आपली मनोगत व्यक्त करून घोषणाबाजी देण्यात आली.यावेळी दि.१० आगस्ट २०२२ ला होणाऱ्या राज्य कृती समितीच्या निर्णयाबाबत सर्व कर्मचाऱ्यात जनजागृती करण्यात आली.
या द्वार सभेचे सुञसंचालन महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे यांनी केले तर आभार एमएसईबी वर्कर्स फेडरेशन विजय भोयर यांनी मानले यावेळी चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या संघटना संयुक्त समितीचे नवल दामले,कृती समिती संयोजक अमोल मोंढे,सचिव संदीप भोयर, जी ई ए चे अध्यक्ष परेश इटकलकर,विभागीय सचिव सुशील लांबट,मनसेचे शाखा सचिव तथा कृती समिती संयोजक देवराव कोंडेकर,धर्मेंद्र कनाके,अशोक लोहार ,विजयसिंग राठोड,रवी बोबडे,केंद्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र लहाने,गजानन कोरडे ,विजय राठोड,एस ई एचे गणेश लहाने,विशाल फिसके,राहुल कीर्तने,हरीश रहाटे केंद्रीय सहसचिव,सिद्धार्थ चिमुरकर, बहुजन पावर संघटनेचे सचिव दिलीप मोहोड,झोन सचिव प्रकाश वाघमारे, पी. एस. खोब्रागडे शाखा अध्यक्ष, के जी राजगडकर शाखा सचिव व सर्व सघंटनाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment