चंद्रपुर :- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.
आज 9 आॅगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणुन चंद्रपूरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आज चंद्रपूरात समाज बांधवांच्या वतीन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील बिरसा मुंडा स्मारक जवळून सदर रॅलीला सुरवात झाली. ही रॅली गांधी चौक येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. या रॅलीत सहभागी समाज बांधवांसाठी येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमुख वैशाली मेश्राम, सिध्दार्थ मेश्राम, शेखर मेश्राम, वैशाल मेश्राम, संतोष कुळमेथे, सतिश सोनटक्के आदिंची उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment