Ads

डॅा.नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांचा व सूत्रधारांचा तपास लावून कठोर शिक्षा द्यावी*

चंद्रपूर:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॅा.नरेंद्र दाभोळकर यांचा दि.२० आगस्ट २०१३ ला सकाळी मॉर्निग वॅाकवरून परत येताना त्याच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली.त्या घटनेला ०९ वर्षे पूर्ण झाली.
खुनाचा तपास करण्यात होत असलेली दिरंगाई दूर करून त्यांच्या मारेकऱ्यांचा व मुख्य सूत्रधारांचा योग्य तपास लावून कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशी द्यावी करिता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने देशाच्या राष्ट्रपती,पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना चंद्रपूरचे जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाणे यांना शहीद डाँ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत निवेदन देण्यात आले.
        यावेळी महा अंनिसचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष मा.पी.एम.जाधव, जिल्हाध्यक्ष मा सूर्यकांत खनके,चंद्रपूर जिल्हा प्रधान सचिव मा नारायण चव्हाण,चंद्रपूर शहर शाखेचे कार्याध्यक्ष सुनिल भोयर,ऊर्जानगर शाखेचे अध्यक्ष राजा वेमुला, कार्याध्यक्ष सचिव देवराव कोंडेकर,प्रधान सचिव दुरेंद्र गेडाम तसेच महा अंनिसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment