घुग्घुस :-भारतीय कोयला खदान मजदूर संघ समन्वय समिती वेकोली, नागपूर च्या वतीने घुगुस येतील उपक्षेत्रीय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले असून आपल्या विविध मागण्या वेकोली व्यवस्थापनासमोर मांडल्या आहे .आंदोलनाच्या पाचव्या दिवशी संघटनेचे रमेश खरपकर, चंद्रकांत कापडे व गजानन कोमावार या साखळी उपोषणात सहभागी झाले असून संघटनेचे इतर पदाधिकारी उपोषणास बसले असून कामगारांच्या विविध मागण्यासाठी ते आग्रही आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्यात जेबीसीसीआई 11 ला अतिशिघ़ लागू करावा, स्पेशल लिव्ह चे जेव्हा पर्यंत मेडिकल बोर्ड बसत नाही तोपर्यंत कामगारांना निरंतर स्पेशल लिव्ह चे भुगतान करण्यात यावे, मॅनपावर बजेट 2022- 23 च्या नुसार मायनिंग सरदार, ओव्हरसीयर ,लिपिक, डीईओ ज्युनिअर टेक्निशियन इन्स्पेक्टर, पँरा मेडिकल स्टॉप आधी रिक्त पदे भरण्यास त्वरित विभागीय परीक्षा घेण्याची अधिसूचना जारी करावी आदीसह एकूण 16 मागण्यांचा यात समावेश आहे.
याविषयी संघटनेतर्फे जनजागरण सभा ,द्वार सभा, नारबाजी, उपक्षेत्रात धरणा प्रदर्शन ,क्रमिक अनशन क्षेत्रीय स्तरावर एक आठवडा पर्यंत आंदोलनात करण्यात आले आहे. या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात न आल्यास कोळसा वाहतूक बंद पाडून एक दिवसीय या तीन दिवसीय अनिश्चित कालीन आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
@ या आंदोलनात स्थानिक, वेकोली तथा कोल इंडिया स्तरावरील कोयला कामगारांच्या विविध समस्या घेऊन वेळोवेळी प्रबंधनाच्या लक्षात आणून दिल्या परंतु प्रबंधनाच्या उदासीनतेमुळे समस्यांची पूर्तता झाली नाही. कामगारांच्या हिताच्या या मागण्यांचे त्वरित निराकरण न झाल्यास भारतीय कोयला खदान मजदूर संघातर्फे आंदोलन अधिक तीव्र करणार- विजय मालवी, भारतीय कोयला खदान मजदूर संघ ,कल्याण समिती सदस्य ,वनी क्षेत्र@

0 comments:
Post a Comment