Ads

क्षुल्लक कारणावरून मजुराने केली बांधकाम ठेकेदाराची हत्या

चंद्रपूर :- शहरात सर्वाना थक्क करणारी घटना उघडकीस आली आहे, लहानश्या कारणावरून मजुराने बांधकाम ठेकेदाराला ठार केल्याची धक्कादायक घटना 3 सप्टेंबर ला घडली.
मृतक समीर रत्नाकर भोयर हा बांधकाम ठेकेदार होता, Constructioncontractor
बांधकामाचे काम हातात घेत तो संसाराचा गाडा चालवीत होता.contractor was killed by a laborer
नवीन कामे हातात घेतल्यावर समीर नेहमी मजुरांना कामे द्यायचा, मात्र 2 सप्टेंबर ला समीर घरून निघाला तर तो परत आलाच नाही.
समीर 2 सप्टेंबर ला वाहनचालक संदेश कवाडे सोबत बाहेर गेला होता, मात्र दुसऱ्या दिवशी वाहनचालक कवाडे यांनी समीर च्या पत्नीला फोन करीत तुमचा पती दारू पिऊन पडला आहे असे सांगितले.
समीर ला घरी न आणता सरळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र समीर याचा मृत्यू झाला होता.
चंद्रपूर शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला, मात्र पोलिसांना शंका आल्याने समीर च्या मृत्यूबद्दल चौकशी सुरू केली.
चौकशी दरम्यान समीर ची हत्या झाली हे निष्पन्न झाले, 3 सप्टेंबरला सकाळी समीर हा श्री टॉकीज चौकातील मजुरांच्या ठिय्यावर पोहचला असता, एक मजूर गजानन अल्लारवार हा झोपून होता, समीर ने त्याला झोपेतून उठविण्यासाठी त्याच्या गालावर 2 थापड मारल्या.
गालावर थापड का मारली म्हणून गजानन ने समीर ला लाथा बुक्क्यांनी मारहाण केला, या मारहाणीत समीर च्या गुप्तांगाला जबर मार बसल्याने समीर चा मृत्यू झाला.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे सपोनि अतुल थुल यांनी शवविच्छेदणाच्या प्राथमिक अहवालानुसार आरोपी गजानन वर हत्येचा गुन्हा दाखल करीत अटक केली.
सदरचा गुन्हा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उघडकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात सपोनि अतुल थुल, पोउपनी बाबा डोमकावळे, सुरेंद्र खनके, शहबाज सय्यद, दर्शन फुलझेले व गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे उघड केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment