ब्रम्हपुरी :- नागभीड तालुक्यातील आदर्श ग्राम अशी ओळख असलेल्या कोटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक राहुल कळंबे यांना जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने दिला जाणारा मानाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. Rahul Kalambe honored with District Ideal Teacher Award.....!!
या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार , कार्यक्रमाचे बक्षीस वितरक चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार, प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) दिपेंद्र लोखंडे ,डायट प्राचार्य धनंजय चापले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे , वित्त अधिकारी मातकर साहेब उपस्थित होते. ..!!

सामाजिक,राष्ट्रीय,शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल यापूर्वी देखील त्यांना राज्यस्तरीय मानांकित संस्थेकडून विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल चिमूर विधानसभा आमदार बंटीभाऊ भांगडीया,खंड विकास अधिकारी प्रणाली खोचरे,गटशिक्षणाधिकारी अरविंद चिलबुले,माजी जि.प. सदस्य संजय गजपुरे, माजी उपनगराध्यक्ष गणेश तर्वेकर, गोंडवाना सिनेट सदस्य प्राचार्य देवीदास चिलबुले व अजय काबरा, कोटगाव चे सरपंच सुनील वाघ, उपसरपंच यशवंत भेंडारकर, शाळा समितीचे अध्यक्ष सतीश मेश्राम, मुख्याध्यापक कुळे तसेच कोटगाव ग्रामवासी यांनी अभिनंदन केले आहे .

0 comments:
Post a Comment