भद्रावती : तालुक्यातील घोडपेठ येथील तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी विवेक लोणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तंटामुक्त गाव समिती पुनर्गठित करण्याबाबत घोडपेठ येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विवेक लोणे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. घोडपेठ येथे शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष विवेक लोणे यांनी सांगितले.
निवडीबद्दल गिरीश माहुलकर, महेंद्र शंखावार, देवानंद शंखावार, अमीत निमकर, विनोद मुडपल्लीवार, क्रिष्णा नगराळे, गौरव माळी, प्यारेलाल वर्मा, सुरज दुर्गे, आशीष जोगी, पप्पु माणुसमारे यांनी अभिनंदन केले आहे.

0 comments:
Post a Comment