चंद्रपूर - स्वातंत्र्य, समता व न्याय अशा तत्वातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूरच्या भूमीतून १६ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षा दिली. बौद्ध धम्म हा भारतातून उगम झालेला विश्वव्यापी धम्म आहे. चंद्रपूर येथील दीक्षाभूमी ही केवळ वास्तू न राहता समाज परिवर्तनाचे केंद्र बनावे, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
यावेळी दीक्षाभूमी परिसरात दोन टप्प्यात 50 लक्ष निधी समाज भवणाकरिता देणार असल्याचे घोषित केले. Dikshabhoomi memorial to become center of social transformation
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या वतीने ऐतिहासिक दीक्षाभूमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त रविवारी आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. खासदार बाळू धानोरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, डॉ. अण्णासामी, डॉ. यु. जाटीला, जेष्ठ साहित्यक आणि विचारवंत लक्ष्मण माने, माजी नगरसेवक राहुल घोटेकर, कुणाल घोटेकर यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
खासदार बाळू धानोरकर म्हणाले, आता आपल्याला चळवळ अधिक गतिमान करण्याची गरज आहे. मागील आठ वर्षांपासून चळवळी जाणीवपूर्वक शांत केल्या जात आहेत. परंतु आम्ही देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा आमच्या जवळ आहे. गुलामगिरी विरोधात लढण्याकरिता संविधानाचे आम्ही रक्षण करू, असा विश्वास सर्वांना दिला. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
0 comments:
Post a Comment