घुग्घुस : औदयोगिक नगरीतील शेकडोंच्या संख्येने शालेय विद्यार्थी आय टी आय, पॉलिटेक्निक, इंजिनिरिंग कॉलेज,वैद्यकीय कॉलेज, लॉ कॉलेज तसेच सरकारी व खाजगी आस्थापने सह अन्य कार्या करीता घुग्घुस ते चंद्रपूर प्रवास करणाऱ्या नागरिकांना सकाळी 09 ते 11 पर्यंत व सांयकाळी 06 ते 10 दरम्यान बस उपलब्ध राहत नसल्याने नागरिकांना अवैध वाहतुकीने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
सदर समस्येची तक्रार क्रांती ज्योत बेंडले, भूषण झाडे या विद्यार्थ्यांनी काँग्रेस कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्याकडे केली असता रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सैय्यद अनवर यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेवून आगार प्रमुख हेमंत गोवर्धन यांची कार्यालयात भेट घेऊन त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत सविस्तरपणे चर्चा करून निवेदन दिले.
आगार प्रमुख गोवर्धन यांनी सदर मुद्दा सकारात्मकपणे घेऊन वाढीव बस देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी रोशन दंतलवार, नुरुल सिद्दिकी,अनुप भंडारी,अमित सावरकर,रफिक शेख,बालकिशन कुळसंगे यांच्या सह अन्य पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment