चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात तरुण - अधिकारी दाखल झाल्यावर गंभीर गुन्हे डिटेक्शन प्रमाण वाढले आहे.सध्या दुचाकी चोरांवर संक्रांत आली असून वाहनाचोरल्यावर अवघ्या काही वेळात गुन्हेगारपोलिसांच्या ताब्यात असतो.
सध्या चंद्रपूर शहर पोलीस व रामनगर पोलीस दुचाकी चोरांवर लक्ष ठेवून आहे. Crime news
3 महिन्यांपूर्वी सचिन मधुकर पुंड यांनी दुचाकी वाहन एकाकडून खरेदी केले होते, मात्र ते वाहन जुलै ला प्रशासकीय भवन परिसरातून चोरी गेली. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी वाहन क्रमांक MH34R 3023 कुठेही आढळून आली नाही. Chandrapur police
1 ऑगस्ट 2022 ला फिर्यादी सचिन पुंड यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी वाहन चोरी बाबत तक्रार नोंदविली. वाहन चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शोध पथक प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व पोउपर्न विनोद भुरले यांनी अथक परिश्रम करीत वाहन चोरीचा पर्दाफाश करीत आरोपी 28 वर्षीय अमो गुलाब शेंडे रा. मुंडाळा, तालुका सावली जिल्हा चंद्रपूर याला ताब्यात घेतले.
सदर आरोपिकडून 3 दुचाकी वाहन जप्त करण्या आले, यामध्ये MH34R3023, MH342449 MH34BS7405 या वाहनाचा समावेश आहे. तीन दुचाकी सहित एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल रामनगर पोलिसांनी जप्त केला.
सदर गुन्ह्याचा यशस्वी तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजे मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमु हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, किशोर वैरागडे, विनोद यादव, निलेश मुडे, सतीश अवथरे विकास जुमनाके, लालू यादव, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, विकास जाधव यांनी केला.

0 comments:
Post a Comment