भद्रावती तालुका प्रतिनिधी :
आज महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी मीडिया शी बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा सुप्रिया सुळे ह्यांच्या विरोधात अभद्र भाषेचा वापर केला
हा फक्त खा सुप्रिया सुळे चा अपमान नसून हा संपूर्ण स्त्री जातीचा अपमान आहे.Chandrapur youth NCP protest against Agriculture Minister Abdul Sattar for abusing NCP leader MP Supriya Sule
एकी कडे महिला सशक्तीकरण करणं सुरू असताना राज्याचे कृषिमंत्री असे अभद्र शब्द महिले साठी वापरतात म्हणून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख,आणि प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर् ह्यांच्या सुचने नुसार युवक जिल्हाध्यक्ष फय्याज शेख आणि युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात कृषीमंत्री अबुल सत्तार विरोधात आंदोलन करून अब्दुल सत्तार ह्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आले
आंदोलना दरम्यान चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, संभाजी खेवले,माजी सरपंच अमोल ठाकरे, बब्बु मुसा ,पंकज ठेंगरे,मनोज सोनी,राहुल वाघ अक्षय सगदेव, संजू बिस्वास, तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment