Ads

वरोरा शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आमदार धानोरकर यांनी प्रशासनाला धरले धारेवर .

वरोरा:वरोरा शहरात होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर आज थेट नगर परिषदेत पोहचल्या. प्रशासनाला याबाबत जाब विचारून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने पावले उचलण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मागील दोन महिन्यापासून पूर्ण शहरात अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक तक्रारी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे आल्या होत्या. आज सोमवारी सकाळी आमदार धानोरकर पदाधिकाऱ्यांसह नगर परिषदेत धडकल्या. मुख्याधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी याबाबत खडे बोल सुनावले.
MLA Dhanorkar took the administration to task regarding irregular water supply in warora city
पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी जलदगतीने सोडवून वरोरा शहराचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देऊन, नवीन पाणी पंप खरेदीसाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना केल्या.
अनेक दिवसापासून रखडलेल्या नवीन विस्तारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याच्या दृष्टीने लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न घेऊ असेही आमदार धानोरकर म्हणाल्या.
याप्रसंगी मुख्याधिकारी गजानन भोयर, पाणीपुरवठा अभियंता लाड, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, गजानन मेश्राम, राजु महाजन, छोटूभाई शेख, अनिल झोटिंग व इतर पदाधिकारी आणी नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment