चंद्रपूर: महाऔष्णिक विज केंद्राच्या उर्जानगर वसाहत येथील रहिवासी श्री राजेंद्र भिवाजी पोईनकर हे मागील वीस वर्षा पासून गुरुदेव सेवा मंडळ चे कार्य सातत्याने करीत आहे ते संगीत शिक्षण असून उत्तम हार्मोनियम वादक व उत्तम गायक आहेत.त्यांनी आपली नौकरी व कुटुंब सांभाळून अनेक मुलांना संगीताचे धडे दिलेत. जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून सन्मानित केले आहेत.अशा कर्तृत्वान व्यक्तीच्या कार्याची दाखल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद यांनी घेतली असून त्यांना या 2022 वर्षीचा स्व. मोहनलाल व कुंदनलाल शर्मा स्मूर्तीप्रित्यर्थ दिला जाणारा श्रीगुरुदेव भजन गायन पुरस्कार हा श्री राजेंद्र पोईनकर यांना जाहीर झालेला असून सदर पुरस्कार हा आदर्श गाव घाटकूळ ता.पोंभुरणा जि. चंद्रपूर येथे दि. 12 व 13 नोव्हे 2022 ला होणाऱ्या 18 व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य विचार कृती संमेलनात मान्यवर पाहुण्याच्या हस्ते प्रधान करण्यात येणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्याची निवड झाल्याबद्दल सर्वश्री शंकर दरेकर, मुरलीधर गोहणे प्रशांत दुर्गे, विलास उगे,देवराव कोंडेकर, नानाजी बावणे, रामदास तुमसरे, खेमदेव कन्नमवार, अशोक धमाने, सदाशिव आघाव, गणेश लहाने,बंडू कुळमेथे,सदाशिव आघाव, मुक्ता पोईनकर, सुषमा उगे, योगिता कोंडेकर ,अर्चना गोहणे आदींनी अभिनंदन केले आहेत.
0 comments:
Post a Comment