Ads

इको-प्रो संस्थेच्या वतीने "निसर्गासोबत युवा" विशेष अभियान

चंद्रपुर :इको-प्रो पर्यावरण संस्थेच्या वतीने एक नोव्हेबरपासून "निसर्गासोबत युवा" "Youth with Nature"विशेष अभियान सुरू आहे. यात पडोली येथील सुशिलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालयातील जवळपास शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
"Youth with Nature" Special Mission by Eco-Pro organization
यंदा दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना समाजकार्य, निसर्ग, व्यक्तीमत्व विकास, श्रमदान याचे महत्व कळावे, यासाठी विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे, हे अभियान येत्या 15 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. समाजकार्य महविद्यालयाच्या अभ्यासक्रम व्यतिरिक्त समाजकार्य मधे सक्रिय असलेल्या इको-प्रो संस्थेच्या कृतिशील उपक्रमात सहभाग, प्रत्यक्ष संस्थेच्या उपक्रमात कार्य करण्याची संधी देण्यात आलेली आहे.

या अभियानात विद्यार्थ्यांना सामाजिक क्षेत्रातील कार्य त्या कार्यासाठी येणारे विविध अडचणी आणि तो दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा समाजाबद्दलची बांधिलकी अधिक विकसित व्हावी आणि या दृष्टीने कृतीशील कार्यक्रम घेण्यात येत आहे. मागील 7 दिवसाच्या पासून सुरू असलेल्या या अभियानातून या विद्यार्थ्यांनी विविध अभियान, चळवळी, इको प्रोचे झालेले आंदोलन व संघर्ष त्याच्या मागील भूमिका उद्देश लोकसहभाग कसा पद्धतीने मिळवला गेला, या संदर्भात माहिती देण्यात आली. सोबतच संस्था ज्या ज्या विविध क्षेत्रात काम करते त्यांची माहिती त्यांना रोज देण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत रोज सकाळी साडेसहा ते साडेदहा पहिले सत्र आणि त्यानंतर दुपारी दुसरा सत्र होत आहे.
पुढेही हे अभियान पुढचे सात आठ दिवस चालणार आहे. यातून "निसर्गासाठी युवा", "देशासाठी युवा", "सेवेसाठी युवा" या संकल्पना अधिक प्रगटपणे विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. विशेष करून 'संविधान आणि मूलभूत कर्तव्य' यावर केंद्रित असून आज युवा पीढिना अहिंसा, सत्याग्रह, स्वच्छता, संघटन, सहकार्य, एकता ही मूल्यावर आधारित शिबिर असून या संपूर्ण शिबिरात इको-प्रो चे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी बंडू धोतरे नियमित त्यांना मार्गदर्शन आणि विविध अभियानाची माहिती देत त्यांना प्रत्यक्ष कृतीशील कार्यक्रमात सहभागी करून घेत आहे. या अभियान मधे संस्थेच्या विविध विभागाचे प्रमुख-उपप्रमुख यांचे सहकार्य लाभत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment