Ads

घुग्घुस परिसरात वाघांचा शावकासह मुक्त संचार

घुग्घुस : शहरात गेल्या अनेक दिवसापासून पट्टेदार वाघाचं मुक्त संचार असल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.
आंबेडकर व शिवनगर येथे काही दिवसांपूर्वी वाघाने गाईच्या वासरूचे शिकार केले होते.
तर कैलास नगर येथे अनेकांना वाघांने दर्शन दिल्याने वेकोली कर्मी, वाहतूकदार, शेतकरी यांना प्रचंड दहशतीत जगावे लागत आहे.
Free movement of tigers with cubs in Ghugus area
आज पहाटेच्या सुमारास अमराई वॉर्डातील वाहजुद्दीन हे 65 वर्षीय इसम प्रांतविधी करिता गेले असता भुस्खलनात रिकामी केलेल्या वस्तीच्या मध्य भागत
वाघ सदृश्य आकृती दिसली समोर कुत्रा असल्याच्या गैरसमजाने ते जवळ गेले असता त्यांची भंबेरी उडाली ते तडक घरी परत येऊन आपल्या कुटुंबाला माहिती दिली.

त्यांच्या मुलाने देखील वडिलांना गैरसमज झाला असल्याचा समजून दुर्लक्ष केले.
मात्र वडिलांच्या आग्रहाने त्यांनी सदर भागाचे परीक्षण केले असता संपूर्ण परिसरात वाघांचे पायांचे पंजे (पगमार्क) दिसून आले.

सदर घटनास्थळी काँग्रेस नेते राजुरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार,नुरुल सिद्दिकी, मोसीम शेख यांनी भेट दिली काँग्रेस अध्यक्ष रेड्डी यांनी सदर वाघांचे तातळीने बंदोबस्त करून नागरिकांना दहशतीतुन मुक्त करावे असे आवाहन केले
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment