चंद्रपूर : केंद्रात भाजप सत्ता आल्यापासून देशात स्वायत्त संस्थांना स्वातंत्र्य उरलेले नाही. हिंदुत्ववादी विचारांच्या सत्ताधाऱ्यांनी या देशाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा परिवर्तनाची गरज असून, "गांधींसोबत चला""Come with Gandhi" असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी केले.An appeal by senior thinker Chandrakant Wankhede
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो Bharat jodo Yatra यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग वाढावा यासाठी चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत संवाद आणि चर्चा मंगळवारी हॉटेल एन डी येथे आयोजित करण्यात आली. बैठकीला व्यासपीठावर खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. भारत जोडो यात्रेने ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला. या यात्रेला समर्थन देण्यासाठी चंद्रपूर शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि पत्रकारांशी संवाद व चर्चा घडवून आणण्यात आली. यावेळी जेष्ठ गांधी विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांनी गांधीजी ते गांधी पर्यंतचा प्रवास उघडला. देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर झालेल्या सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराची मांडणी केली. मागील आठ दहा वर्षांपासून सत्ताकारणात घडलेल्या घडामोडी आणि देशाचे भवितव्य यावर त्यांनी विवेचन केले.
या बैठकीचे प्रास्ताविक खासदार बाळू धानोरकर यांनी केले, तर आभार विनोद दत्तात्रय यांनी मानले.
0 comments:
Post a Comment