भद्रावती तालुका प्रतिनिधी :
भद्रावती शहरातील ऐतिहासिक चंडीका मंदिर परिसरात दिनांक ८ ला सकाळच्या सुमारास एक पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळले. घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून अर्भकाला ताब्यात घेतले व स्थानिक ग्रामीण रुग्णालयात त्याच्या आरोग्याची तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी या अर्भकाला बघण्यासाठी मंदिर परिसरात चांलीच गर्दी केली.A newborn baby was found in the area of Chandika temple in Bhadravati.
सकाळी या अर्भकाची चाहुल एका पाळीव कुत्रीला लागली तिने घरी येऊन आपल्या विशीष्ट आवाजात मालकाजवळ ओरडने सुरु केले मालकाने कुत्रीच्या मागे जाऊन बघितल्यानंतर त्यांना हे अर्भक आढळले. लागलीच याची माहिती पोलीसांना देण्यात आली.या अर्भकाच्या भोवती मुंग्या गोळा झाल्या होत्या.पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेऊन त्याची ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी केली व त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. या अर्भकाच्या अज्ञात मातेला शोधण्यासाठी पोलीस परिसरातील वार्डावार्डात जाऊन शोधकार्य करीत आहे.
0 comments:
Post a Comment