Ads

वाघाच्या हल्ल्यात 65 वर्षीय शेतकरी ठार

सावली प्रतिनिधी :वन्यजीवांच्या अधिवासावर मानवी आक्रमण वाढू लागल्याने वन्य प्राण्यांचा मनुष्यवस्तीत वावर वाढू लागला आहे. यामुळे मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे.
65-year-old farmer killed in tiger attack
सावली तालुक्यात जनवरी 2022ते डिसेंबर 2022 या कालावधी 4 मनुष्यांवर प्राण्यांचे हल्ले झालेले असून.तालुक्यामध्ये सदर आकडेवारी बघता प्रशासनाने त्वरित पावले उचलून येथील वाघ अन्यस्तरीय स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून व वन्यप्रेमी कडून मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली आहे मागील आठवड्यात सामदा येथील वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या प्रकरणाची शाही वाढते न वाढते तोच आठ दिवसात 2 सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सावली पासून 5 किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय 65 वर्ष हे दैनंदिन प्रमाणे आपल्या शेतीकडे जाण्यासाठी निघाले असता वाटते दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या वर हल्ला करीत त्यांच्या मानेला पकडून वाघ हा जंगल परिसरात घेऊन गेला. वाघ माणसाला नेत असल्याचे दिसून येताच गावकरी त्या घटनास्थळा वरुन त्या दिशेने शोध लागले. या घटनेची माहिती वनविभाग सावली व पोलीस स्टेशन सावली ला देण्यात आली. दोन्ही चमू घटनास्थळी पोहचले.

घटनास्थळा पासून काही दूर अंतरावर बाबुराव कांबळे यांचे मानेपासून खाल्लेले प्रेतच सापडले. त्यानंतर वनविभागाने पंचनामा करुन शवविच्छेदन साठी प्रेत सावली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. या घटनेने मात्र खळबळ माजली असून शेतकरी भयभीत झाले आहे.

सावली तालुक्यातील या आठवड्यात ही दुसरी घटना घडली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment