सावली : जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया आणि तालुका कराटे-डो असोसिएशन मूल ला संलग्नित कराटे क्लब सावली चा खेळाडू उत्कर्ष योगेंद्र आदे ह्याची सावली तालुक्यातून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. 10 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला आणि त्याची निवड विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धेकरिता झालेली आहे.
विभागस्तरावर तो आपल्या वय आणि वजनगटात जिल्ह्याचे नेतृत्व करेल.उत्कर्ष सावली च्या विश्वशांती महाविद्यालय मध्ये 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. तो 'कराटे क्लब सावली' मध्ये मुख्य प्रशिक्षक इम्रान खान सर आणि निलेश गेडाम सर ह्यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतो.विजयी खेळाडू ला जुन्सेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख तथा क्लब चे मार्गदर्शक सेन्सेई विनय बोढे सर यांनी आशीर्वादसह शुभेच्छा दिल्या आहेत तसेच पालक योगेंद्र आदे, मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार सर व क्रीडा शिक्षक संजय गाडगे सर ह्यांनी त्याला सकारात्मक सहकार्य केले आहे. विजयी खेळाडूचे तालुका कराटे-डो असोसिएशन मूल चे सर्व पदाधिकारी व शाळेतील शिक्षकवृंदानी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
0 comments:
Post a Comment