Ads

'सावली तालुक्यातील पहिले कॅन्सरतज्ञ डॉ. नितीन बोमनवार...

सावली :सावली तालुक्यातील मौजा व्याहाड बुज, येथील रहीवासी सेवाभावी शिक्षक तुकारामजी बोमनवार यांचे चिरंजीव डॉ. नितीन तुकारामजी बोमनवार यांनी वैद्यकीय सेवेतील एम.बी.बी.एस., एम.एम.एम.सी.एच. असे स्पेशालिस्ट उच्च शिक्षण घेवून आजच्या स्थितीत ते भिलाई (म.प्र.) येथे कॅन्सर तज्ञ डॉक्टर म्हणुन कार्यरत आहेत ही सावलीक्यासाठी भुषावह आहे.
डॉ. नितीन बोमनवार हे सावली तालुक्यातच ग्रामिण भागातील रहिवासी असले तरी, आजोबा व वडीलांच्या जनहितार्थ कार्याचा ठासा कायम रहावा म्हणुन त्यांनी जनसेवेचे माध्यम म्हणुन आरोग्य क्षेत्राची निवड केली. गावात प्राथमिक शिक्षण घेवून गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालयात १२ वी चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर यवतमाळ येथील वसंतरा नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. नागपूर मेडीकल कॉलेज नागपूर येथे पुर्ण केले. एम.एस. ही (जनरल सर्जन) पदवी मिळविले. त्यानंतर एम.सी.एच. (कर्करोग तज्ञ) ही पदवी मिळविण्यासाठी मागील तीन वर्षापासुन कॅन्सर तज्ञ म्हणुन कार्य करीत आहेत. नागपूर मेडीकल कॉलेजला असतांना या भागातील कोणताही पेशंट नागपूरच्या दवाखान्यात आल्यास जातीने लक्ष देवून त्याचेवर योग्य उपचार करण्यास सहकार्य देत होते. एकंदरीत त्यांचे कुटुंबातील आजोबा, वडील, मोठे भावंड यांचे मार्गदर्शनात आणि त्याच्या जनसेवेतील कार्याचा आदर सन्मान डॉ. नितीन बोमनवार यांचेमध्ये निर्माण झाले यावरुन दिसते. त्यांच्या या सेवेबद्दल तालुक्यात व ग्रामस्थामध्येही वाहवा आहे. ते शिक्षणाने खुप मोठे वाटत असले तरी मात्र त्यांचे राहणीमान, गरीबाविषयी विशेष आस्था यामुळे आपल्याला से सुपर स्पेशालिस्ट तज्ञ डॉक्टरांसारखे वाटत नाही असे दिसते परंतु विचाराने, मनाने ते खुप मोठे आहेत त्यामुळे तालुक्यातील पहिले कॅन्सरतज्ञ म्हणुन डॉ. नितीन बोमनवार यांचे नाव घेतले जाते हे भुषणावह आहे. त्यांचे आरोग्य सेवेतील या कार्याला असेच यश मिळावे, खुप प्रगती व्हावी हीच सदिच्छा.......!
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment