Ads

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर डॉ. ज्ञानेश हटवार यांची निवड..

तालुका प्रतिनिधी (जावेद शेख)
भद्रावती :महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे तर्फे डॉ. ज्ञानेश हटवार यांची मराठी या विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती समिती च्या सदस्यपदी निवड झाली.
Selection of Dr.Dyanesh Hatwar on the State Textbook Production Board.
महाराष्ट्र राज्यपाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ ,बालभारती ,पुणे यांचे कडून इयत्ता पहिली ते बारावी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम केले जाते. या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये महाराष्ट्रातील निवडक प्रतिभावंत प्राध्यापकांची निवड केली जाते. यात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. ज्ञानेश दयारामजी हटवार यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली. वर्ग अकरावी, बारावीच्या मराठी या विषयाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीच्या संबंधाने ही निवड झालेली आहे . राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामार्फत नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार पाठ्यपुस्तक निर्मिती व त्याला पूरक अशा साहित्याची निर्मिती केली जाते.
महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती समितीवर डॉ. ज्ञानेश हटवार यांची निवड झाल्याने भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे , सदस्या श्रीमती निलीमाताई शिंदे , यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, निवृत्त प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर, प्राध्यापक डॉ. सुधीर मोते, शेखर जुमळे , नरेश जांभुळकर , किशोर ढोक, अतुल गुंडावार, हरिहर मोहरकर, अनिल मांदाडे, रमेश चव्हाण, भीष्माचार्य बोरकुटे , राकेश आवारी , प्रवीण मत्ते, माधव केंद्रे, राजेंद्र साबळे, कमलाकर हवाईकर, डॉ. प्रशांत पाठक, सौ उज्वला वानखेडे, प्रेमा पोटदुखे, संगीता जकुलवार ,डॉ. वर्षा दोडके, प्रणिता बोकडे तसेच समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment