चंद्रपुर:गेल्या 75 वर्षापासून अविरत प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाने महाराष्ट्राची लोक वाहिनी म्हणून नावलौकिक मिळविण्यात ज्या कामगारांनी प्रामाणिक सेवा दिली त्यात एसटी चालकांचा सिंहाचा वाटा आहे .
A ceremony was held to honor ST drivers who have served 25 years without an accident
ज्या चालकांनी सातत्याने 25 वर्षे व त्यापेक्षा जास्त काळ सेवा करताना कोणताही अपघात केला नाही अशा अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांचा संपूर्ण महाराष्ट्रात 26 जानेवारी 2023 ला एसटी महामंडळाकडून शाल ;श्रीफळ; सन्मानपत्र; सन्मानचिन्ह व 25 हजार रुपयांचा धनादेश देऊन व त्यांच्या सहचारीनीला साडीचोळी देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम घेण्यात येत आहे.
चंद्रपूर विभागातील 11 अपघात विरहित सेवा देणाऱ्या चालकांचा सपत्नीक सत्कार ताडोबा रोडवरील विभागीय कार्यालयात करण्यात आला. सर्व चालकांचा विभागाच्या विभाग नियंत्रक ,श्रीमती स्मिता सुतवणे ,यंत्र अभियंता ,श्री शितल बिराजदार ,विभागीय वाहतूक अधिकारी श्री पुरुषोत्तम व्यवहारे, कामगार अधिकारी श्री देवानंद पुनमवार ,रंजु घोडमारे;विभा.भांडार अधिकारी श्री जोग ,इतर अधिकारी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री सोलापन यांच्या हस्ते करण्यात आला.
चंद्रपूर आगारातील श्री राजेश महादेव लांडे ,श्री आयुब खान याकूब खान ,श्री मदन शुक्लाल शहा, श्री पंजाब बालाजी जाधव ,श्री प्रकाश गोविंदराव उईके, श्री अरविंद महादेव धोटे ,राजुरा आगारातील श्री संभाजी माधव जाधव ,श्री मोहम्मद रहीम मोहम्मद अंकुश, श्री नामदेव लालूजी परचाके ,वरोरा आगारातील श्री सुदाम शिवाजी मडावी ,व चिमूर आगारातील श्री मारुती घुलाराम लोन गाडगे या सर्व चालकांचा व त्यांच्या सहकारिणींचा सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमास आगारातील व विभागातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभा.वाह.अधि.श्री पुरुषोत्तम व्यवहारे ; संचालन सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री किरण नागापुरे व आभार प्रदर्शन कामगार अधिकारी श्री देवानंद पुनमवार यांनी केले.
0 comments:
Post a Comment