Ads

सावरगाव येथील रोपवाटिकेच्या वन डेपोतील लाकडांना लागली आग

(प्रशांत गेडाम):-नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.)वन परीक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील रोपवाटिकेच्या वन डेपोतील लाकडांना अचानक आग लागल्याने तेथील लिलावासाठी ठेवण्यात आलेली अनेक जातीची लाकडे जळली. असल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सायंकाळ पर्यन्त आग विझविण्यात वन विभागाला प्रयत्न करावे लागले.
A fire broke out in the forest depot of the nursery in Savargaon
. तळोधी वन परीक्षेत्र कार्यालया अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथे वन विभागाची रोपवाटिका व डेपो आहे. या डेपोमध्ये अनेक सोसायट्यांची लाकडें आहेत. ही लाकडे लिलावाद्वारे व्यापाऱ्यांना विकली जातात. या अगोदर एप्रिल महिन्यात महावितरणच्या विद्युत तारांच्या घर्शनानेच आग लागली होती.पुन्हा शनिवारला याच डेपोमध्ये विद्युत महावितरण कंपनीच्या तारांना झाडांचा घर्षण होऊन आग लागल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली.असून यामध्ये जवळपास 30 बिट जळाली असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.यामध्ये लाखाच्या वर वनविभागाची नुकसान झालेली आहे.दरम्यान नागभीड येथील अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले असून सायंकाळ पर्यन्त आग विझविण्यात वन विभागाला यश आले.यावेळी तळोधी वन परीक्षेत्राचे अधिकारी गायकवाड, क्षेत्र सहायक एस. बी.वाळके, वनरक्षक एस. बी.पेंदाम, धनंजय येळणे, येरमे,आदी वनरक्षक, वनमजूर,व पी.आर टी चे सदस्य, 'स्वाब नेचर केयर' संस्थेचे सदस्य, आदींनी आग विझविन्याकरिता धडपड केली.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment