Ads

'हाथ से हाथ जोडो अभियान' लोकचळवळ व्हावी

चंद्रपूर : काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे निर्माण झालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान 'Haath Se Haath Jodo' campaign जिल्ह्यात राबविले जात असून या अभियानाचा शुभारंभ येत्या प्रजासत्ताकदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे. 'हाथ से हाथ जोडो अभियान' लोकचळवळ व्हावी असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
'Haath Se Haath Jodo Mission' should be a people's movement
आज एन डी हॉटेल येथे 'हाथ से हाथ जोडो अभियान' संदर्भात जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार, माजी पालकमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजुरकर, निरीक्षक म्युझिक पठाण, प्रदेश सचिव रवींद्र देरकर, प्रदेश सचिव जियाभाई पटेल, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते संदीप गड्डमवार, काँग्रेस नेते विजय नळे,चंद्रपूर काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, चंद्रपूर मध्यवर्ती बँक अध्यक्ष संतोष रावत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्ह्यात झालेली वातावरण निर्मिती टिकवून ठेवणे गरजेचे असून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती फायदेशीर ठरावी यासाठी ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान राबविले जात आहे. आपण जे बोलतो ते करतो. त्यामुळे आपल्याला यश मिळत आहे. पुढील दोन वर्षे निवडणुकांचे असून या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसला निश्चितपणे भरीव यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तुम्ही पदवीधर मध्ये साथ दिली, शिक्षक मध्ये परतफेड करू : आमदार सुनील केदार

चंद्रपूर : पदवीधर मतदार संघाचे नागपूर येथील उमेदवार अभिजित वंजारी हे होते. त्यांना चंद्रपूर येथील काँग्रेस व पदवीधर युवकांनी साथ देत निवडून आणले. त्याची परतफेड करण्याची जबाबदारी आता नागपूरकर म्हणून आम्हावर आहे. आता शिक्षक मतदार संघाचे महाविकास आघाडी सरकारचे अधिकृत उमेदवार चंद्रपूरचे सुधाकर अडबाले यांना पाठींबा दिला आहे. त्यांना निवडून येण्यासाठी नागपूरकर म्हणून आम्ही प्रयत्न करून जिकून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment