Ads

पालकांच्या विनापरवाणगीने शैक्षणिक सहलीचे आयोजन

गोंडपीपरी :– तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल लगतच्या जंगलातील गार्डन मध्ये पालकांच्या विनापरवाणगीने नेण्यात आली मात्र जेवणातून दहा विधर्थ्याना विषबाधा झाली असून त्या दहाही विद्यार्थ्याना ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे भरती करण्यात आले आहेOrganization of educational trip without parental permission

Poisoning of ten students from food

चेक बोरगाव येथिल जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल लगत असलेल्या खराळपेठ जंगलाच्या गार्डन मध्ये नेण्यात आली.सोबतच चिकनाचे स्नेहभोजन करण्यात आले , मात्र सहली करिता एकाही पालकांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती,शासकीय नियमाप्रमाणे सहलीच्या पूर्वी शाळाव्यवस्थापन समितीचा ठराव घेणे बंधनकारक असून शिक्षणाधिकारी यांचीही परवानगी घेणे बंधनकारक असताना कार्यरत शिक्षकाने असे काहीही केलेले नाही असे पालकांचे म्हणणे आहे.येथे एक ते चार वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत व एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहली करिता हजेरी लावली,त्यात एक 22 वर्षीय गावातीलच मुलगा संजय बक्षी याला मदतीकरिता शिक्षकाने सोबत घेतले होते अशा एकूण अकरा जणांना विषबाधा झाली असून त्यांना उपचारार्थ गोंडीपीपरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यात भरती आत्राम,श्रावणी शेंडे,टिना बोरकुटे,खुशाल बोरकुटे,सतीश वेलादी,रुद्रमनी वेलादी,क्रीश वेलादी,आदित्य वेलादी,संस्कार झाडे,पारस झाडे आणि सुमेध बक्षी यांचा समावेश आहे.
सहलीमध्ये एकूण 52 विद्यार्थी दोन शिक्षक आणि इतरत्र तीन अशी एकूण57 जणांनी जेवणाचा आस्वाद घेतला मात्र त्यापैकी अकरा जनांनाच विषबाधा झाली कशी हाही प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहे तेव्हा या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment