चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील डॉक्टर आंबेडकर नगर प्रभाग हा दलित प्रभाग म्हणून शहरात ओळखले जाते, या प्रभागात पूर्वी मोठ्या प्रमाणात विठाभट्टी चे गड्डे पाहायला मिळायचे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्यामुळे मनवी जीवनास आवश्यक संसाधने पुरवठा आणि पहावा तसा विकास चंद्रपूर मनपा प्रशासनाला करता आला नाही. आजही अनेक समस्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. नाले आणि रस्ते, संबधीत कामे नगरसेवक यांनी अर्धवट केल्याने या समस्यात आणखी मोठी भर पडली आहे.
Prevent misuse of dalit development fund and make necessary reforms in dalit ward.. Aam Aadmi Party
ज्यामुळे नाल्याने वाहत आलेली घाण कचरा परीसरात साचून राहून रोगराई सारखे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशी तक्रार वॉर्डातील लोकांनी आप चे शहर सचिव राजू कुडे यांचा कडे केली त्या अनुषंगाने आज मनपा प्रशासनाला दलित निधीचा वापर, दलित वस्ती मध्येच करून या समस्या कायम स्वरुपी सोडवाव्या अशी मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे करण्यात आली आहे. यावेळेस आप चे शहर सचिव तथा मनपा निवडणूक प्रभारी राजु कुडे, जयदेव देवगडे, भिमराज बागेसर, रजनी ताई गडेवार , किरण कुमरवार, मंगला मेश्राम, अर्चना निमगडे, दर्शना रामटेके, रितेश निमगडे, स्नेहल रामटेके, प्रतिक जनबंधू, मनीषा खोब्रागडे पंकज तेलसे इत्यादी कार्यकर्ते तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते..
0 comments:
Post a Comment