Ads

सोने पालीश करुन देतो म्हणुन साडेतीन तोळे सोने पळविले. शहरातील नागसेन नगर येथील घटना.

भद्रावती जावेद शेख प्रतिनिधी :
सोन्याला पालीश करुन देतो म्हणुन एका दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात इसमांनी साडेतीन तोळे सोने पळविले.सदर घटना दिनांक 23रोज गुरुवारला दुपारी 1वाजताच्या दरम्यान शहरातील नागसेन नगर येथे घडली.Three and a half tolas of gold were stolen as the gold was polished.
Incident at Nagsen Nagar in the city.
या घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात करण्यात आली असुन त्यांनी दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.दुपारच्या वेळेस एका काळ्या रंगाच्या एका दुचाकी गाडीने दोन अज्ञात इसम नागसेन नगर येथे आले.व त्यांनी मारोती बोरकर यांना सोन्याला पालीश करुन देतो म्हणुन त्यांचेकडून साडेतीन तोळे सोने हस्तगत केले.व मोटरसायकलने पसार झाले.या दोन इसमांपैकी जाड असलेल्या इसमाने आकाशी रंगाचा शर्ट व निळा पैंट तर दुसऱ्या सडपातळ इसमाने पांढरा शर्ट व काळा पैंट परिधान केला होता.हे चोरटे सिसी टिव्ही कैमर्यात कैद झाले असुन भद्रावती पोलीस फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे.दरम्यान ठाणेदार इंगळे यांनी नागरिकांनी अज्ञात इसमांना घरात येऊ देऊ नये व त्यांच्याशी कोणताही व्यवहार करु नये असे आवाहण केले आहे.या अज्ञात चोतट्यांना पकडण्याचे आव्हाण नवे ठाणेदार इंगळे यांच्यासमोर आहे.घटनेचा तपास ठाणेदार इंगळे यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment