Ads

भाजपाचा जेष्ठ लढवय्या नेता हरपला!

चंद्रपुर :पुण्याचे भाजप खासदार आणि विधिमंडळातील माझे सहकारी मित्र गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. १९७३ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या गिरीश बापट यांनी पुण्यासह महाराष्ट्रात भाजपच्या यशस्वी वाटचालीत मोठे योगदान दिले.भाजपची पुण्याची ताकद म्हणून गिरीश बापट यांची ओळख होती.
BJP's senior fighting leader lost
टेल्को कंपनीत १९७३ मध्ये काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या बापट यांनी नगरसेवक, आमदार, राज्यातील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले. १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार असलेल्या बापट यांनी पुण्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून बापट यांनी भरीव कामगिरी केली. २०१९ पासून पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने ते निवडून आले. तेव्हापासून पुण्याच्या विकासाला त्यांनी अधिक वेग दिला. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या वर पुण्यात उपचारही सुरू होते. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. बापट यांच्या जाण्याचे मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून न निघणारी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गतीप्रदान करो अश्या शब्दात ना सुधीर मुनगटीवार यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment