(प्रशांत गेडाम)सावली- सावली तालुक्यातील बोरमाळा येथे हृदय पिळवटूनटाकणारी घटना घडली असूनआईच्या देखत. घरासमोर खेळत हर्षल संजय कारमेगे वय 4 वर्ष रा बोरमाळा ता. सावली जिल्हा चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्याबालकाचे नाव आहे.A four-year-old boy who was playing in front of the house was carried away by a tiger
जवळच असलेल्या आईने आरडाओरडा केला. परंतु तोपर्यंत वाघ मुलाला घेऊन पसार झाला. गावकरी, वनविभाग व पोलिस विभागाचा कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध घेतला असता गावाशेजारी हर्षलचा मृतदेह आढळला. हर्षल हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा असून वडील हे तेलंगाणात मिर्ची तोडणीसाठी गेले आहेत. या घटनेने बोरमाळा व परिसरात शोककळा पसरली असून या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सावली परिसरात वाघाच्या हल्ल्यात मनुष्यहानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment