Ads

मार्निंग वॉक निघालेल्या इसमावर बिबट्याचा हल्ला.

भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी :-गेल्या महिण्याभरात शहरातील आयुध निर्माणी परिसरातील दोन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केल्यानंतरही परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.सकाळी मार्निंग वाकला निघालेल्या वसाहतितील एका पंचेचाळीस वर्षीय इसमावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले.
Man was attacked by a leopard during the morning walk.
सदर घटना दिनांक 21रोज मंगळवारला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास वसाहतीत घडली.या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे.सुरेंद्रसींग चव्हाण असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे.सुरेंद्रसींग चव्हाण हे आपल्या डिएससी येथील कार्टरमधून सकाळी नेहमीप्रमाणे मार्निंग वाकला निघाले असता वसाहतितील मुख्य रस्त्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.मोठ्या हिंमतीने त्यांनी या बिबट्याचा प्रतिकार करीत स्वतः ची सुटका केली.त्यांना वसाहतितील निर्माणी च्या दवाखाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच भद्रावती वनपरिक्षेत्राचे अधिकारी एच. पी. शेंडे यांनी आपल्या सहकार्यासह घटनास्थळ गाठून घटनेची माहिती जाणुन घेतली व पंचनामा केला.एक महिण्या अगोदर याच वसाहतीत फिरायला निघालेल्या एका महिलेवर एका बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली होती.त्यानंतर या परिसरातून दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले होते.त्यावेळी वसाहतितील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र या घटनेने परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.बिबटची जे्रबंध कारण्याची मागणी नागरिकांनी केली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment