Ads

महानगर पालिका क्षेत्राकरिता स्वतंत्र तहसील कार्यालय तर घुग्गुस साठी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करा - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर:- शहरी आणि ग्रामीण भागाचे काम एकाच तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन चालत असल्याने येथे अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध योजनांचे प्रमाणपत्र, फेरफार प्रकरणे, नझुल जागेबाबत प्रश्न, सातबारा उतारा, फेरफार, तक्रारीच्या सुनावण्या, जुने रेकॉर्ड सांभाळणे हे सर्व कामे प्रभावित होत आहे. त्यामुळे साधारणत: 4 लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र तहसील कर्यालयाची निर्मिती करण्यात यावी, तसेच घुग्घूस व लगतच्या गावासांठी अपर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
Create separate tehsil office for municipal area and additional tehsil office for Ghuggus - MLA. Kishore Jorgewar
मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थंसकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पातील मागण्यांवरील चर्चेसाठी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. चंद्रपूर हे 500 वर्ष जुने शहर आहे. असे असतांना अजूनही येथील अनेक भुखंड हे लीज लॅंन्ड म्हणून येथे 30 वर्षाची लिज दिली जायची. नंतर ती लीज नुतनीकरण केल्या जायची. मात्र शासनाने 5 टक्के रक्कम भरत त्या जागा स्वमालकीच्या करण्याचा निर्णय केला. मात्र हि प्रक्रिया अतिशय कासवगतीने सुरु असल्यामुळे नागरिकांना त्या जागेचा नकाशा मंजुर करता येत नाही. कर्ज घेता येत नाही. शासकीय योजनांपासुनही वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे विशेष बाब अंतर्गत प्रशासनाने हा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

घुग्घुस नगर परिषद येथे स्टेडीयम निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी जागा मोजनीचे 94 हजार रुपयेही भरण्यात आले आहे. येथे उत्तम स्टेडीयम तयार करण्यासाठी सदर जागा तात्काळ घुग्घुस नगर पालिकेला हस्तांतरीत करण्यात यावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. चंद्रपूर येथे अनेक ले-आउट पडले आहे. येथे एका प्लॉटची मोजणी करायची असेल तर ती करता येत नाही. त्यामुळे संपूर्ण ले-आउटची मोजणी करावी लागत असुन त्याचे अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी पूढाकार घेत संपुर्ण ले-आउट ची मोजणी न करता केवळ एका प्लॉटची मोजणी करता येईल असे नियम करावेत अशी मागणीही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे नागरिकांनी बांधलेल्या घरांची मोजणी करता येत नाही. त्याची विक्री होत नाही. त्यामुळे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लाखो करोड रुपयांचे व्यवहार केल्या जात आहे. यामुळे शासनाचा महसुल बुडत असुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. हि बाब लक्षात घेता महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्रात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्यात यावा, येत्या काळात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी अव्वल कारकुन यांना पदोन्नती देत नायब तहसीलदारांची रिक्त असलेली 110 ते 115 पदे भरण्यात यावी.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सफारी करिता चंद्रपूरकरांना सवलत देण्यात यावी, मागच्या सरकारने 171 हेक्टर जागेमध्ये 286 कोटीची टायगर सफारी आणि वन्यजीव रेस्क्यू सेंटरची घोषणा केली होती. या टायगर सफारीचे काम लवकर सुरु करण्यात यावे, वन हक्क दाव्यांकडे लक्ष देण्यात यावे, ताडोबामध्ये असलेल्या प्रत्येक वाघाचा पक्षीचा वेगळा इतिहास आहे. पहिले येथे मृत पावलेल्या प्राण्यांचे पक्षांचे अस्तीत्व साबुत ठेवत त्यांची प्रतिकृती येथे बनविल्या जात होती. मात्र आता ते बंद झाले आहे. ते पून्हा एकदा सुरु करत एक सुंदर असे संग्रहालय येथे सुरु करण्यात यावे, चंद्रपूर मधील रामबाग मध्ये असलेल्या जागेत पांरपारिक खेळांच क्रिडांगण तयार करण्यात यावे, कापसाच्या 1200 च्या वर बियाणांचे वाण आहे. एवढे वाण असतांना सुध्दा उत्पादकता केवळ 42 टक्केच आहे. त्यामुळे मातीच परिक्षण करत पाच किंव्हा 10 वाण कृषीविभागाने घोषीत करावे, कृषी सहायक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे, चंद्रपूर जिल्हाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण होत आहे. याला उर्वरित निधी देत या कार्यालयाचे काम पुर्ण करण्यात यावे, अधिकारी आणि कर्मचा-यांकरिता 15 कोटी रुपयांचा निधी द्यावा, विदर्भातील पंढरपूर म्हणुन ओळखल्या जाणा-या वढा तिर्थक्षेत येथे जाणारा मार्ग मोठा करित येथे छोट्या पुलाची निर्मीती करण्यासाठी निधी देण्यात यावी, विचोडा आणि म्हातारदेवी येथे छोटे पुल आणि रस्त्याची निर्मीती करावी अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment