Ads

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे दुचाकी वाटप

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतर्फे घोणाड सेवा सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदांना सहा दुचाकी वाहनकर्ज रक्कम रु. ७ लाख ८४ हजार चे वाटप करण्यात आले.Motorcycle Distribution by Chandrapur District Central Cooperative Bank

यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक वडगावकर, निरीक्षक आर. आर. बाराहाते, व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सौ. आशा उरकुंडे, सचिव बोबडे यांचे हस्ते चाब्या देवून दुचाकी वाटप करण्यात आल्या.

जिल्हा बँकेतर्फे शेतकरी, शेतमजूर, महिला व बेरोजगार यांचे करीता विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत. बेरोजगारांकरीता स्वावलंबी रोजगार योजना आहे. बचत गटांसाठी अनेक महिला विकासाच्या योजना आहे. या योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन रवींद्र शिंदे यांनी केले.

यावेळी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment