(प्रशांत गेडाम) तळोधी (बा.) -: नागभीड जवळील तळोधी बाळापुर येथील पी. एस. आय. आकाश साखरे यांनी तळोधी बा.पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात होत असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसेल यासाठी धाडसत्र सुरु केले आहे. Taking action against illegal sand smugglers has left the smugglers in a tizzy
अशातच रात्रौ च्या वेळी ग्रस्त घालून सावरगाव वाढोणा मुख्य रोड व जिवनापुर परिसरात रात्रीच्या वेळेस रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर दिसुन आला सदर चा ट्रॅक्टर-ट्रालीची वाहन चालकाची झडती घेतली असता विना परवान्या ची अवैध रेती वाहना मध्ये मिळून आल्याने अवैध वाहतूक करणारा ट्रक्टर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. व सदरच्या रेती तस्करावर कलम - 379,भा.द.वि. नुसार गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे. ही कारवाई पी. एस. आय. साखरे यांचा आदेशान्वये नेवारे, भानाकर यांनी केली आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी व अनेक अवैध धंदे वाढले असून पी. एस. आय. साखरे यांनी धाड सत्र सुरू केल्याने परीसरातील रेती तस्करी व अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
0 comments:
Post a Comment