सावली :सावली तालुक्यातील वाघोली बुट्टी येथील ममता हरिचंद बोदलकर या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे वाघोली बुट्टी परिसरात दहशत निर्माण झाली आहे.The woman was killed on the spot in the tiger attack
ममता बोदलकर यांच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. याबाबतची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्याची कार्यवाही सुरू होती. वाघांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे सावली तालुक्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
0 comments:
Post a Comment